रँकर्स हबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि प्रेरणादायी मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

Khozmaster
2 Min Read

रँकर्स हबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि प्रेरणादायी मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

दक्षिण नागपूर | ५ जुलै

रँकर्स हबच्या वतीने शनिवारी दिनांक ५ जुलै रोजी भाग्यलक्ष्मी सभागृहात एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक कार्यक्रम संपन्न झाला. या विशेष सोहळ्यात दक्षिण नागपूर परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील इयत्ता ८वी, ९वी, १०वी आणि १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ. मंगलाताई खेकरे यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. विवेक नानोटी आणि नामवंत सायंटिस्ट अजिंक्य कोत्तावार हे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवनाने वातावरण अधिकच पावन झाले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सायंटिस्ट अजिंक्य कोत्तावार यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांविषयी मार्गदर्शन करत, “नेहमीच एकापेक्षा अधिक पर्याय — प्लॅन A, B आणि C — तयार ठेवावेत,” असा मोलाचा सल्ला दिला. डॉ. नानोटी यांनी संघर्षातून यशाकडे जाण्याच्या मंत्रासह विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. सौ. खेकरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सदैव सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा सल्ला देत कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

दुसऱ्या सत्रात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी देण्यात आली. रँकर्स हबच्या या अभिनंदन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. दीपक निपाने यांनी केली, तर रँकर्स हबच्या संचालिका सौ. पूनम दीपक निपाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखा व्यवस्थापक निखिल मार्गमवार, मिस तायडे, अनामिका मेश्राम, राशी बरडे, हर्षल लेंडे, सुशील जाधव व संपूर्ण रँकर्स हबच्या चमूने परिश्रमपूर्वक योगदान दिले.

हा प्रेरणादायी सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्मरणीय ठरला असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करणारा ठरला.

0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *