नवी दिल्ली (प्रतिनिधी):
औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृतीला बळकटी देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळामार्फत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण भवन येथे हा समारंभ पार पडला. कार्यक्रमात मंत्री जाधव यांनी संजय वायाळ यांच्या औषधी वनस्पती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली. त्यांनी औषधी वनस्पतींचे वैज्ञानिक पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्याच्या उपक्रमात त्यांचे योगदान ‘प्रेरणादायक’ असल्याचे सांगितले. टिश्यू कल्चरद्वारे आरईटी वनस्पतींचे संवर्धन या करारांतर्गत, टिश्यू कल्चर पद्धती वापरून दुर्मिळ, लुप्तप्राय व धोक्यात असलेल्या (RET) श्रेणीतील औषधी वनस्पतींची जनुकीय सामग्री जतन केली जाईल. यामुळे आयुष क्षेत्रातील औषधी वनस्पतींचा पुरवठा सुलभ होईल, तसेच या वनस्पतींच्या लागवड व देखभालीचे शास्त्रीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित होतील.
उद्योग व संशोधन क्षेत्राला चालना सामंजस्य करारांमुळे आयुष उद्योगातील उत्पादन व औषधनिर्मितीला चालना मिळणार असून, भागधारकांना शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मॉडेल तयार करण्याची संधी मिळेल. दोन्ही पक्ष आपापल्या कौशल्यांचा आणि संसाधनांचा वापर करून औषधी वनस्पती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहकार्य करतील.
औषधी वनस्पती संवर्धनासाठी आयुष मंत्रालयाचा पुढाकार; राष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करार
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment