सिध्दिदात्री ..
सिध्दी दात्री पुजितो
नववी माळ ओवता
विलोभनीय दुजी न
रे उत्सवाची सांगता
कमलासनी शोभली
रंगगुलाबी आवडता
चतुर्भुजा सुहासिनी
अष्ट सिध्दीत गाढता
देवीच्या रूपात दिसे
सुहासिनी निरागसता
हास्य तिचे निरामय
मुलायमता स्निग्धता
भासे हंसिनी चालली
चालीत मन मोहकता
शांती पूर्ण जीवन हवे
दूर सारिते दाहकता
कमळातली निर्मलता
आचारा असो नम्रता
सत्वगुण मातेस प्रिय
भक्ती उक्ती एकाग्रता
कपट कुस्पट ना मनी
अशी असावी संहिता
संदेश देते शक्ति माता
कार्य करावे सर्वाहिता
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 15