यवतमाळ प्रतिनिधी
वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण, विद्यार्थिनींनी सामूहिक गायनातून व्यक्त केली एकतेची भावना
येथील महिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला शाळेच्या पर्यवेक्षिका रेखा कुडमते व ज्येष्ठ शिक्षक टिकले यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
पर्यवेक्षिका रेखाताई कुडमते यांनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी राष्ट्रीय एकतेचे आणि अखंडतेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ याला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी सामूहिक स्वरांमध्ये वंदे मातरमचे गायन करून देशभक्तीचा नारा दिला.
या कार्यक्रमात एकता, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा विद्यार्थिनींनी घेतली. कार्यक्रमाचे संचालन पूर्णिमा कुळकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहूल ढोणे यांनी मानले.येथील महिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला शाळेच्या पर्यवेक्षिका रेखा कुडमते व ज्येष्ठ शिक्षक टिकले यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
पर्यवेक्षिका रेखाताई कुडमते यांनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी राष्ट्रीय एकतेचे आणि अखंडतेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ याला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी सामूहिक स्वरांमध्ये वंदे मातरमचे गायन करून देशभक्तीचा नारा दिला.
या कार्यक्रमात एकता, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा विद्यार्थिनींनी घेतली. कार्यक्रमाचे संचालन पूर्णिमा कुळकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहूल ढोणे यांनी मानले.