आज जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला

KHOZ MASTER
1 Min Read

यवतमाळ –

आज जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला. यामध्ये दर्डा नगर येथील जैस्वाल पेट्रोल पंप तसेच पांढरकवडा रोडवरील धनगंगा पेट्रोल पंप येथे भेट देऊन त्यांनी तपासणी केली.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप कार्यालयातील नोंदवही, वर्षनिहाय इंधन पुरवठ्याची माहिती, संबंधित दस्तावेज तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली. इंधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित ठेवावा तसेच इंधन साठ्याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या.

या पाहणीवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच संबंधित पेट्रोल पंप चालक उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *