यवतमाळमध्ये माहेश्वरी महिला मंडळतर्फे अन्नकूट व सुंदरकांड कार्यक्रमाचे भव्य आयोजन कन्या पुत्री सन्मान सोहळ्यात पाच कुटुंबांचा गौरव; समाजातील एकतेचा सुंदर संदेश

Khozmaster
1 Min Read

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ येथील महेश भवनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माहेश्वरी महिला मंडळ, यवतमाळ तर्फे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अन्नकूट आणि सुंदरकांड या धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माहेश्वरी समाजातील अनेक सदस्यांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सुंदरकांड पठणाने झाली. त्यानंतर भक्तिभावाने बाल गोपालांना भजन गाऊन नैवेद्य अर्पण करण्यात आला. पुढे पूजा, अर्चना आणि आरतीने संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भरून गेले.

धार्मिक कार्यक्रमानंतर महेश सेवा समिती तर्फे ‘कन्या पुत्री सन्मान सोहळा’ पार पडला. या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात वर्षभरात ज्या कुटुंबात कन्येचा जन्म झाला, त्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. यावर्षी एकूण पाच कुटुंबांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानासोबत प्रत्येक कन्येच्या नावाने पाच हजार रुपयांची मुदत ठेव (एफडी) दिली गेली.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या यशस्वी आयोजनासाठी माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी युवा संघटना, महेश पतसंस्था, महेश सेवा समिती तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.

माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या मनिहार, सचिव रजनी कलंत्री आणि कोषाध्यक्षा साधना खडलोया यांनी सांगितले की, “समाजातील एकता, श्रद्धा आणि सेवा भावनेच्या बळावरच या कार्यक्रमाचे यश शक्य झाले.”

0 9 4 5 7 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *