नागपूर प्रतिनिधी ;-
राज्य राखीव पोलीस दलाच्या ३३व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४, संभाजीनगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत *१८ संघांतील तब्बल १८०० खेळाडू* सहभागी झाले.
या कठीण स्पर्धेत राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४, नागपूर यांनी चमकदार कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट केली आणि जनरल चॅम्पियनशिपमध्ये चौथा क्रमांक पटकावला.
नागपूर गटाची उल्लेखनीय कामगिरी
संघ स्पर्धा:
फुटबॉल – सुवर्णपदक
खो-खो – सुवर्णपदक
क्रॉसकंट्री – सुवर्णपदक
मार्च पास परेड – प्रथम क्रमांक
वैयक्तिक स्पर्धा:
कुस्ती:
ए.आर. लोनगाडगे – सुवर्ण
ए.एस. टाक – कांस्य
एस.एम. गिते – कांस्य
अॅथलेटिक्स:
१०,००० मी. – एल.पी. नेतने (कांस्य)
२०० मी. – ए.यू. घरजाडे (रौप्य), एस.व्ही. सूर्यवंशी (कांस्य)
८०० मी. – आर.जे. साखरे (कांस्य)
३,००० मी. – एच.जे. मडावी (सुवर्ण)
त्रिपाल चेस – एच.जे. मडावी (सुवर्ण)
थाळीफेक – बी.एम. गुट्टे (रौप्य)
बॉक्सिंग:
७५ किलो – एस.आर. पोतीवाल (रौप्य)
५५ किलो – एन.आर. चव्हाण (कांस्य)
५० किलो – पी.जी. ठाकरे (कांस्य)
बॉडी बिल्डिंग:
ए.आ. लोनगाडगे – रौप्य
एच.जे. मडावी – कांस्य*सांगता समारंभ
७ नोव्हेंबर रोजी झालेल्या समारंभात
अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर (भापोसे)
आणि
विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी (भापोसे)
यांच्या अध्यक्षतेखाली पदक प्रदान करण्यात आल
नागपूर गटाच्या उत्कृष्ट कामगिरीचे राज्यभरातून कौतुक होत असून, या पदकांनी संपूर्ण दलाचा गौरव वाढविला आहे.
Users Today : 22