विशेष प्रतिनिधी ;-
कळंब तालुक्यातील कामटवाडा येथील पुलावर रविवारी (९ नोव्हेंबर) रात्री भीषण अपघात झाला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत रवि मेहत्रे (यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतक
रवि मेहत्रे, सदस्य — आठवडी बाजार असोसिएशन, यवतमाळ
गंभीर जखमी
निखिल दौलत्कार
महेश ठेंगरे
शंकर जयस्वाल
(सर्व रा. यवतमाळ)
घटनेचा क्रम
नागपूर येथे लग्नसमारंभ आटपून पाचही जण रात्री उशिरा यवतमाळकडे परतत होते. कामटवाडा पुलाजवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन सुमारे 20–25 फूट खाली कोसळले.
उपचार
जखमींना तातडीने यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता पाहता त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच ऑटो डील असोसिएशन, यवतमाळ यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.
Users Today : 51