नागपूर प्रतिनिधी :-
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या *‘खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२५’*च्या पाचव्या दिवशी प्रेक्षकांसाठी हास्याचा भरगच्च मेजवानीचा कार्यक्रम रंगला.
११ नोव्हेंबरच्या सायंकाळी लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तील कलाकारांनी सादर केलेल्या प्रहसनांनी सभागृहात अक्षरशः हशा पिकवला.
या हास्यरात्रीत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, प्राजक्ता माळी, समीर चौगुले, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर आणि प्रभाकर मोरे यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांची मने जिंकली.
सई ताम्हणकरने वऱ्हाडी भाषेतील संवादांनी नागपूरकरांचे मन जिंकले, तर प्रसाद खांडेकरच्या एण्ट्रीनं कार्यक्रमाला नवी रंगत आणली.
समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांनी सादर केलेल्या ‘रस्ता सुरक्षा’ या प्रहसनात विनोदासह सामाजिक संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रस्तुतींनीही प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गजर उसळला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘देवा श्रीगणेशा’ या गणेशवंदनेने झाली.
यानंतर ‘लख्ख पडला प्रकाश मशालीचा’ हे प्रेरणादायी गीत चैतन्य देवडेने सादर केले.
या सोहळ्याला केंद्रीय मंत्री आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, कांचन गडकरी,
माहिती आयुक्त गजानन निमदेव, तसेच राज्यातील विविध वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची पारंपरिक सुरुवात करण्यात आली.
या वेळी हास्यजत्रेचे लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे, सोनी मराठीचे अमित फाळके, तसेच कलाकार शिवाली परब, श्याम राजपूत, ईशा डे, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रथमेश शिवलकर, निखिल बने, दत्तू मोरे, मंदार मांडवकर, विराज जगताप आदींची उपस्थिती होती.
आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, तसेच योगेश बन, अॅड. नितीन तेलगोटे आणि आशिष वादिले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन बाळ कुलकर्णी आणि रेणुका देशकर यांनी केले.
Users Today : 17