नागपूर प्रतिनिधी :-
नागपूरच्या नंदनवन परिसरात बंदूक बाळगणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव चैतन्य उर्फ चिंटू रामकृष्ण डांगरे (वय ३५, रा. न्यू नंदनवन ले-आउट) असे आहे.
मंगळवारी (११ नोव्हेंबर) मध्यरात्रीनंतर गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा पथक नंदनवन हद्दीत गस्त घालत असताना,
त्यांना माहिती मिळाली की जे. एल. चतुर्वेदी कॉलेजच्या मागे एक व्यक्ती अग्निशस्त्रासह फिरत आहे.
तत्काळ कारवाई करत पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.
पंचासमक्ष त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे अग्निशस्त्र, मॅगझीन आणि जिवंत काडतूस आढळले.
त्याच्याकडून अग्निशस्त्र, काडतूस आणि मोबाइल असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत समजले की आरोपी हा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र बाळगून होता तसेच त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले होते.
या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून त्याला मुद्देमालासह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोनि राहुल शिरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केली.
Users Today : 22