नागपूर: अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या बापाची फाशी शिक्षा जन्मठेपेत बदलली

Khozmaster
2 Min Read

नागपूर प्रतिनिधी :-

स्वतःच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या गुड्डू छोटेलाल रजक (वय ४२) या पित्याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेत रूपांतरित केली आहे. ही थरारक घटना नागपूरच्या कळमना परिसरात घडली होती.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
दरम्यान, न्यायालयाने भादंवि कलम ३७६ (बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत लावलेले गुन्हे रद्द करत आरोपीला या कलमांतून दोषमुक्त केले, मात्र खूनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
पार्श्वभूमी:
२१ मे २०२४ रोजी विशेष सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी रजकला फाशीची शिक्षा सुनावली होती. कायद्याने अशा शिक्षेवर उच्च न्यायालयाची शिक्कामोर्तब प्रक्रिया आवश्यक असल्याने राज्य सरकारने हे प्रकरण हायकोर्टात दाखल केले होते.
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
आरोपीने तीन विवाह केले होते.
दुसरी पत्नी आरतीच्या आत्महत्येनंतर, तिसरी पत्नी कौशल्या पिपरडे हिच्याशी लग्न केले.
आरोपीने आपल्या मोठ्या मुलीवर वारंवार अत्याचार केले, आणि तिने शिक्षकांकडे तक्रार देण्याची धमकी दिल्यावर संतापून तिचा गळा आवळून खून केला.
या गुन्ह्यातून बचाव करण्यासाठी आरोपीने कौशल्या व तिच्या कुटुंबावर खोटा आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिस तपासात सत्य उघडकीस आले.
सरकारतर्फे बाजू मांडली:
या प्रकरणात सरकारी वकील अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी युक्तिवाद केला, त्यांना अॅड. अनुप बदर यांनी सहकार्य केले.
फाशीची शिक्षा रद्द — जन्मठेप कायम.
पोक्सो व बलात्काराचे कलमातून दोषमुक्त.
हायकोर्टाने दिला अंतिम निर्णय.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *