जम्मू-काश्मीर :-
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI भारतातील दहशतवादाचा कट रचत असल्याचे ताजे सुरक्षा अपडेट समोर आले आहे. मागील वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू असल्याची खात्री करून पुरुषांवर लक्ष्य केले गेले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लाल किल्ल्याजवळ एका आत्मघाती हल्ल्यामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीप्रमाणे, नवीन वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट असल्याचे समोर आले आहे. या कटासाठी जवळपास 150 पाकिस्तानी दहशतवादी घनदाट जंगलात लपलेले आहेत. त्यातील 70 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय असून, उर्वरित जम्मूमध्ये लपून बसलेले आहेत.
सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घनदाट जंगल, धुकं आणि उंच डोंगरांचा फायदा घेऊन दहशतवादी छुप्या मार्गाने प्रवेश करण्याचा धोका निर्माण करतात. तसेच, काश्मीरी भाषा येत असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण ठरत आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानपूरस्कृत दहशतवाद्यांचा स्थानिक काश्मिरींवरील विश्वास कमी झाला असून, स्थानिकांनी सुरक्षा यंत्रणांना दिलेल्या इनपुटमुळे अनेक कटांना उधळा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चाल बदलून दहशतवाद्यांना हिंदू लोकांना टार्गेट करण्यासाठी परत पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दल सतर्क आहेत.
Users Today : 34