‘आपनापन’ पुस्तकातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा मानवी पैलू उलगडला

KHOZ MASTER
1 Min Read

शिवराजसिंह चौहान लिखित पुस्तकाची होत आहे चर्चा

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लिखित ‘आपनापन’ या पुस्तकाची सध्या विविध स्तरांवर चर्चा होत असून, या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा मानवी आणि प्रेरणादायी पैलू प्रभावीपणे उलगडण्यात आल्याची भावना वाचकांकडून व्यक्त केली जात आहे.

या पुस्तकामध्ये कार्यकर्त्यांशी असलेला आत्मीय संवाद, जिव्हाळ्याचे संबंध आणि “राष्ट्र प्रथम” या विचाराप्रती असलेली बांधिलकी अत्यंत प्रभावी शैलीत मांडण्यात आली आहे. संघटनशक्ती, नेतृत्वगुण आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या भावनिक नात्याचे अनेक प्रसंग पुस्तकात अनुभवायला मिळतात.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक वाचकांकडून हे पुस्तक प्रेरणादायी दस्तऐवज म्हणून पाहिले जात आहे. नेतृत्व कसे असावे, कार्यकर्त्यांशी संवाद कसा ठेवावा आणि राष्ट्रहित सर्वोच्च मानून कार्य करण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पुस्तकप्रेमी आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये ‘आपनापन’ या पुस्तकाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली असून विविध माध्यमांतून या पुस्तकाची माहिती आणि चर्चा होताना दिसत आहे.

0 9 7 6 4 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *