देऊळगाव राजा प्रतिनिधी :
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात
अंतर्गत तक्रार निवारण समिती द्वारा जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थिनींसाठी प्रज्ञाशोध कार्यक्रम अंतर्गत अनेक गुण / प्रतिभा सादरीकरणाची संधी
उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये अभिनय करणे, गीत गायन करणे, स्वयंस्फूर्त भाषण करणे, मिमिक्री करणे, चित्र किंवा रांगोळी रेखाटणे, कविता, भारुड सादर करणे, अशा उपक्रमांचा समावेश होता. समिती समन्वयक डॉ. ज्योती ढोकले यांनी वरील कार्यक्रमाचे आणि महिला सबलीकरण या थीमअंतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे नियोजन केले होते. याप्रसंगी परीक्षक म्हणून डॉ. अनंत आवटी व प्रा. मधुकर जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.
सूत्रसंचालन सानिया पठाण, प्रास्ताविक श्रुती तांबे, आभार निशा मोरे या विद्यार्थिनींनी केले. या वेळी रोशनी साबळे व पूनम भागिले यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली.
प्रज्ञाशोध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रूपाली तेलगड, प्रा. मंजुषा मुळे, प्रा. सीमा धुळे, प्रा. निर्जला सरोदे यांनी परिश्रम घेतले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 18