देऊळगाव राजाचे निसर्ग वैभव आता आगीच्या विळख्यात सापडले आहे! समाजकंटकांनी वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा :

शहराचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या महादेव खोरा परिसरातील वनराईला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा प्रकार आज ८ मार्च रोजी उघडकीस आला.

जाफराबाद बायपास रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग आणि नगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांतून उभी राहिलेली ही हिरवीगार वनराई अचानक आगीच्या विळख्यात सापडली.

सायंकाळच्या सुमारास लागलेली ही आग नैसर्गिक नसून जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील जैवविविधता आणि शेकडो झाडे धोक्यात आली आहेत.

घटनेची माहिती मिळताच ‘धरती बचाओ मिशन’ आणि ‘ग्लोबल इंडिया फेडरेशन’ या सामाजिक संस्थांचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे, दुर्गेश बनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी मोकळ आणि शिंपणे यांनीही यंत्रणा कार्यान्वित करून आग विझवण्याचे काम सुरू केले.

रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

विशेष म्हणजे यापूर्वीही या वनराईला आग लावून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता.
पुन्हा अशी घटना घडणे ही पर्यावरणासाठी अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे

0 9 3 8 7 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *