मातृभूमीस्तव अर्पिले प्राण… आमचा अभिमान शहीद जवान!

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा :
भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असताना Dattatray Kashiram Nikam (रा. केसापूर, ता. बुलढाणा) या वीर जवानांना तीन वर्षांपूर्वी वीरगती प्राप्त झाली. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर जवानाच्या स्मृती जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी एक अनोखी पुढाकार घेतली आहे. 🇮🇳

केसापूर गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गावात शहीद स्मारक उभारले असून या स्मारकाचे महापूजन, लोकार्पण व शहीद जवान स्व. दत्तात्रय निकम यांचे तृतीय पुण्यस्मरण काल मोठ्या भावपूर्ण वातावरणात पार पडले.

या कार्यक्रमाला विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी शहीद जवानाला पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी सांगितले की,

“मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले त्या वीर जवानांप्रति आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.”

स्व. दत्तात्रय निकम यांच्या स्मारकामुळे गावातील नव्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

भारतभूमीच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचे अर्पण करणाऱ्या सर्व वीर जवानांप्रति देश सदैव कृतज्ञ आणि नतमस्तक आहे.

0 9 3 8 7 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *