मोताळा प्रतिनिधी :
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी उपासक सुभद्र याला महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणी धम्मदीक्षा दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९५६ रोजी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण केली. त्यांनी महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत धम्माला जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक व शिबिर प्रमुख ज्ञानोबा कांबळे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मोताळा यांच्या वतीने धुसर येथे १९ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय श्रामणेर शिबिराच्या समारोप प्रसंगी ते श्रामणेर संघाला मार्गदर्शन करत होते.
समारोप कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पूज्य भन्ते बी. सारीपुत्त यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले. या शिबिरामध्ये एकूण २५ शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के. के. शेगोकार, भन्ते सारीपुत्त तसेच शिबिर प्रमुख ज्ञानोबा कांबळे यांच्या हस्ते शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी धम्मपीठावर जिल्हा उपाध्यक्ष संस्कार दिलीप मेढे, एम. ओ. सरकटे, डी. एन. खंडारे, एस. एस. वले, एम. एस. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 2