पारखेड फाटा येथे दुचाकी चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी :

तालुक्यातील पारखेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सजनपुरी (ता. खामगाव) येथील रहिवासी सैय्यद अफसर सैय्यद अकबर हे टायर पंचरचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न (क्र. MH-28-BN-1106) ही मोटारसायकल पारखेड फाटा येथे उभी असताना अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेली.
ही घटना ५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजल्यापासून ते ६ मार्च २०२६ रोजी पहाटे अंदाजे २.३० वाजेदरम्यान घडल्याचा अंदाज आहे. चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे सैय्यद अफसर सैय्यद अकबर यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार भगवान काळबाघे हे करीत आहेत.

0 9 3 9 0 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *