डीपीवर शॉर्टसर्किट; तीन एकर गहू जळून खाक सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :

तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात डीपीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी वर्गातून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी अमोल काशिनाथ तिडके यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक २५७ मधील शेतात ७ मार्च रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेताजवळ असलेल्या वीज वितरण केंद्रावरील (डीपी) शॉर्टसर्किटमुळे अचानक ठिणग्या पडून शेतातील गव्हाच्या पिकाला आग लागली.

आग लागल्यानंतर काही क्षणातच ज्वाळांनी मोठे रूप धारण केले आणि शेतातील सुमारे तीन एकर क्षेत्रातील गव्हाचे उभे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत शेतीच्या बांधावर ठेवण्यात आलेले ठिबक सिंचनाचे साहित्य देखील जळून नष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून तलाठी व कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी अमोल तिडके यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून परिसरातील शेतकरीही या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत आहेत.

0 9 3 9 0 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *