बुलडाणा (प्रतिनिधी) –
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान आणि इंधन दरवाढ यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झाली असून मागणी वाढल्याने दर चांगलेच वाढले आहेत.
सध्या किरकोळ बाजारात लिंबू २०० ते ३०० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या उकाड्यामुळे लिंबू सरबताला मागणी
सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, ताक यांसारख्या घरगुती शीतपेयांना मोठी मागणी वाढली आहे.
विशेषतः सहज उपलब्ध आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे लिंबू सरबताला नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
बाजारात आवक कमी
मात्र बाजारात लिंबाची आवक कमी असल्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
उन्हाळ्याची तीव्रता पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने लिंबाच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Users Today : 21