चिखली : महिला दिनानिमित्त विधानसभेत सक्षमीकरणावर विशेष चर्चा

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली प्रतिनिधी :

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेत महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण या विषयावर विशेष चर्चा झाली.
या चर्चेत सहभागी आमदार श्वेता महाले यांनी डिजिटल युगातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडला. त्यांनी सरकारकडे मागणी केली की राज्यात स्वतंत्र डिजिटल सुरक्षा धोरण निश्चित करून महिलांना प्रभावी सायबर संरक्षण उपलब्ध करून द्यावे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्ताव मांडून सदस्यांना आपली मते मांडण्याची संधी दिली. बोलताना महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले असल्याचे नमूद केले. त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत शासनाच्या प्रयत्नांचे स्वागतही केले.
महाले यांनी सांगितले की, सर्व व्यवहार झपाट्याने ऑनलाइन होत असल्यामुळे अनेक महिलांना डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्याने शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ई-गव्हर्नन्स प्रणालीबाबत महिलांमध्ये व्यापक डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय उपक्रम राबविण्याची गरज आहे.
त्याशिवाय त्यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महिला सुरक्षा कायद्याची कठोर अंमलबजावणी, असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांसाठी विशेष योजना, महिला बचत गट व सहकारी संस्थांना बळ देणे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला प्रतिनिधींसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
महाले यांनी सोशल मीडियावरील छळ तसेच डिजिटल माध्यमातून होणारी फसवणूक याबाबत शालेय स्तरापासूनच महिलांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती आणि प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली. ऑनलाइन छळ किंवा सायबर गुन्ह्यांच्या प्रसंगी मदत कशी मिळवावी याबाबत महिलांना स्पष्ट मार्गदर्शन दिले जाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

0 9 3 9 6 6
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *