राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात २७८६ दिव्यांगांची आरोग्य तपासणी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी व नोंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जिल्हाभरातील २ हजार ७८६ दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तपासणी व साहित्य नोंदणी केली.
आयुष मंत्रालयाच्या वतीने संतनगरी शेगाव येथे हा राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आयुष, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींनुसार आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
दिव्यांग बांधवांसाठी २७ फेब्रुवारी रोजी विशेष आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला.
लवकरच साहित्य वाटप शिबिर
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना कर्णयंत्र, चालण्याचा पट्टा, व्हीलचेअर, इलेक्ट्रिक व्हीलचेअर यांसारखे जवळपास प्रति लाभार्थी सुमारे दहा हजार रुपयांचे साहित्य वितरित करण्यात येणार आहे. याशिवाय काही लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचेही वितरण केले जाणार आहे.
या शिबिरात आवश्यक साहित्याची नोंदणी करण्यात आली असून साहित्य उपलब्ध झाल्यानंतर विशेष शिबिर घेऊन त्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच काही साहित्यांचे वाटप खासदार निधीतूनही करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.
दिव्यांग बांधवांनी नोंदविलेल्या कृत्रिम अवयव निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असून साहित्य वाटप शिबिराची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

0 9 3 9 6 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *