आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ स्मशानभूमीसाठी बाकड्यांची भेट

KHOZ MASTER
1 Min Read

 

देऊळगाव राजा प्रतिनिधी :

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असते. तिच्या आठवणी आयुष्यभर प्रेरणा देत राहतात. अशाच आईच्या स्मृती जपत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देऊळगाव राजा तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवानंद आंधळे यांनी प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविला.

शिवानंद आंधळे यांच्या मातोश्री अनुसयाबाई सुभाष आंधळे यांचे २८ जानेवारी २०२२ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ५४ व्या वर्षी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आंधळे यांनी सामाजिक जाणीव ठेवत पिंप्री आंधळे येथील स्मशानभूमीसाठी बाकड्यांची भेट दिली.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची सोय व्हावी आणि कठीण प्रसंगी थोडा दिलासा मिळावा, या भावनेतून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला.

आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेली ही भेट केवळ श्रद्धांजली नसून समाजासाठीही उपयुक्त ठरणारी आहे. या उपक्रमामुळे गावात सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक संदेश दिला गेला असून, आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती जपत समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा या माध्यमातून मिळत आहे

0 9 3 9 6 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *