अकोटमध्ये गोवंश तस्करी करणाऱ्यांवर कारवाई

KHOZ MASTER
1 Min Read

अकोट प्रतिनिधी :
ग्रामीण पोलीसांच्या ऑपरेशन प्रहार मोहीमेत गोवंशीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.
कारवाईची सविस्तर माहिती:
अकोट ग्रामीण पोलीसांना ७ मार्च रोजी गोपनिय माहिती मिळाली की, काही तस्कर अजंनगावहून अकोट रोडने गोवंशीय प्राणी कत्तलीसाठी आणत आहेत.
वाया फाटा समोर पठार नाल्याजवळ पोलीस नाकेबंदी करीत असताना, मालवाहू महिंद्रा सुप्रो वाहन क्रमांक MH 27 B X 8254 थांबवले गेले.
वाहन चालकाने आपले नाव सांगितले: शेख मुजाहीद शेख मजीद, वय २१ वर्ष, रा. आयडीया टॉवर जवळ, भालदारपुरा, अंजनगाव.
जप्त केलेले मालमत्ता:
गोवंश जातीचे २ बैल – किंमत: ₹65,000
मालवाहू वाहन – किंमत: ₹3,00,000
एकूण मुददेमाल: ₹3,65,000
गुन्हा नोंद:
आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे अकोट ग्रामीण येथे अप.नं. २६८/२०२६ अंतर्गत कलम ५ (अ), ९ महा. प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम ११ (१)(ड) – प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
कारवाई करणारे अधिकारी:
पोलीस अधिक्षक: अर्चित चांडक
अप्पर पोलीस अधिक्षक: चंद्रकांत रेड्डी
सहा. पोलीस अधिक्षक: निखील पाटील
पोलीस निरीक्षक: किशोर जुनघरे
पोहेकॉ: उमेशचंद्र सोळंके
पोकॉ: राजेश माळेकर, सुनिल पाटील
या कारवाईत गोवंश तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलल्याने परिसरात प्राणी संरक्षणाबाबत जनजागृती वाढेल आणि अशा कृत्यांवर प्रतिबंध मिळेल.

0 9 4 5 9 5
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *