डोणगाव –
मराठी नववर्षाचा दिवस डोणगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी नुकसानीचा ठरला. विजांचा जोरदार कडकडाट, वादळी वारा आणि पाऊस यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका आणि कांदा या पिकांना प्रचंड फटका बसला आहे.
घटना तपशील
- डोणगावमध्ये तीन ठिकाणी विज पडली.
- अनेक शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेली गहू, हरभरा, चिया आणि हळद झाकण्याचा प्रयत्न केला, मात्र वादळी पावसामुळे त्यांची मेहनत फसली.
- एकनाथ शिवराम आखाडे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा हरभऱ्याची सुडी झाकण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता आणि शेताच्या जवळ वीज पडली.
- भोवळ येऊन कोसळल्याने एकनाथ आखाडे घाम फुटून, खासगी डॉक्टरांकडे नेल्यावर हृदयविकाराने मृत्यू झाला. नुकसान
- हातातोंडाशी आलेला पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, मुलासमोरच हळहळ निर्माण.
- शेकडो घरातील विद्युत उपकरणे जळाली, स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सामाजिक व प्रशासनिक प्रतिसाद
- स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनांनी प्रशासनाला तातडीने परिस्थितीची माहिती दिली आहे.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
डोणगाव परिसरातील अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पीकांचे नुकसान तसेच एका शेतकऱ्याचा मृत्यू या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Users Today : 22