चिखली –
आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामांमुळे भारतात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावून तणाव निर्माण केला आहे.
सरकारने घरगुती गॅस पुरवठ्यास प्राधान्य दिले असून, व्यावसायिक सिलिंडर पुरवठा मर्यादित केला आहे, तरीही मागणी अधिक असल्याने तुटवडा भासत आहे. नागरिकांनी रांगेत उभे राहून आपली नाराजी व्यक्त केली आहे, काहीजण ऑफिसला थेट दांडी मारून गॅससाठी एजन्सीवर आले आहेत.
इमपॅक्टच्या परिणामी, हॉटेल आणि छोट्या खानावळ्यांवर देखील परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आधीच सुमारे ११५ रुपयांनी वाढले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसायिक चिंता व्यक्त करत आहेत की, गॅस वेळेवर उपलब्ध न झाल्यास भविष्यात अनेक हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे.
शहरातील रामदेव इण्डेन व दहिगाव वाला इण्डेन या एजन्सीसमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी अॅपद्वारे बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक अडचणींमुळे बुकिंग वेळ घेते, असे एजन्सी संचालक शैलेश बाहेती यांनी सांगितले.
गॅस तुटवड्यामुळे काही नागरिक पर्यायी उपाय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करत आहेत. चिखलीतील अनेक दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे, असे संतोष घोरपडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करून गॅस तुटवड्यावर मार्ग काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
Users Today : 22