बुलढाणा –
बुलढाणा जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्या हिंगोली राज्यव्यापी संघटनेत डी. डी. वायाळ यांची अमरावती विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती संघाचे राज्याध्यक्ष फुलतांबकर यांनी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. वायाळ यांनी याआधी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ बुलढाणाचे अध्यक्षपद भूषविले असून शिक्षकांच्या विविध समस्या यशस्वीरित्या मार्गी लावल्या आहेत.
अमरावती विभागात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक ११० शाळा असून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांतील घट आणि शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न यामुळे अनेक शाळांमध्ये वर्ग दोन मुख्याध्यापकांची पदे २०१६ पासून रिक्त आहेत, तर वर्ग तीन मुख्याध्यापकांची, पर्यवेक्षकांची आणि शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.
वायाळ यांच्या नियुक्तीमुळे या विभागातील शिक्षकांच्या समस्या मार्गी लागतील, असे सर्व माध्यमिक शिक्षकांकडून अपेक्षित आहे. नियुक्तीनंतर वायाळ यांनी सांगितले की, संघटनेतील अनुभवाच्या आधारे शिक्षकांना न्याय मिळेल आणि माध्यमिक शाळांच्या सर्व समस्या निकाली काढल्या जातील.
Users Today : 22