सिंदखेड राजा–
मलकापूर पांग्रा येथे गुरुवारी ट्रॅक्टर अपघात झाला, ज्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. कडब्याची वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर समोर बसलेला युवक ट्रॅक्टर कुदल्यामुळे खाली पडला आणि समोरच्या चाकासोबत घसरला.
बिना नंबरच्या ट्रॅक्टरवर चालकासोबत बसलेला समाधान दळवी (वय ३५ वर्षे, रा. भुमराळा) या युवकाच्या पोट आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. जखमी युवकाला सुरुवातीला बीबी रुग्णालयात दाखल केले असता, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातामागील मुख्य कारण म्हणजे पाईपलाईनसाठी खोदलेल्या नाल्या. नेहरू विद्यालय समोर असलेल्या या नाल्यांमुळे अनेक अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिक हनी बागवान यांनी मागणी केली आहे की, संबंधित विभाग या नाल्यांची तातडीने पाहणी करावी, नाल्या बुजवाव्यात आणि अवैध नाल्या खोदणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी.
Users Today : 22