उन्हाचा कडाका असला तरी रमजान उपासासाठी मुस्लिम बांधवांचा उत्साह कायम

KHOZ MASTER
2 Min Read

मेरा खुर्द –

मुस्लिम बांधवांमध्ये आत्मिक आणि भक्तीचे प्रतीक म्हणून पाळल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील उपासाचा उत्साह उन्हाच्या कडाक्यांनाही तोंड देत आहे. फेब्रुवारी १९ तारखेपासून सुरू झालेल्या या महिन्यात २९ उपवास पार पडले असून, ३० वा उपवास होण्याची शक्यता आहे.

सध्या उन्हाची तिव्रता वाढली आहे; त्यामुळे छोटे-मोठे, तरुणांपासून वृद्धापर्यंत मुस्लिम बांधवांना उपास राखणे कठीण जात आहे, तरीही भक्ती आणि उत्साहात कुठलाही घट झालेला नाही.

इस्लाम धर्मामध्ये सांगितलेल्या पाच कर्तव्यांपैकी उपास (रोजा) हा महत्त्वाचा मानला जातो. रमजानमध्ये कुराण पठण, तरावीह नमाज आणि अल्लाहकडे निस्सीम भक्ती व्यक्त करण्याचे दिनक्रम पाळले जातात. दररोज पहाटे सहरी करून संपूर्ण दिवस अन्नपाण्यापासून दूर राहणे, चांगले विचार व आचार ठेवणे आणि संध्याकाळी इफ्तार करून रोजा पूर्ण करणे हे या महिन्याचे पवित्र नियम आहेत.

हिंदू बांधवांकडून गावोगावी आयोजित इफ्तार पार्टीमुळे रमजानमध्ये भक्ती आणि प्रेमभावनेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातही उपास राखणाऱ्यांची संख्या वाढत आहे, लहान मुलेही मोठ्या हिमतीने उपास करत आहेत.

तथापि, यंदा रमजान फेब्रुवारी महिन्यात आले असल्याने आणि दिवस १४ ते १५ तासांचे असल्याने उपास राखणे अधिक कठीण ठरत आहे. तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर सुक्या मेवे व कपड्यांचे भाव वाढल्यामुळे आर्थिक आव्हानही निर्माण झाले आहे.

रमजानचा महिना मुस्लिम बांधवांसाठी शांती, प्रेम आणि भक्तीचा संदेश देणारा असल्याने, या पवित्र महिन्यातील उपासाच्या माध्यमातून समाजात आपुलकी आणि ऐक्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 9 4 5 8 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *