प्रीतमकुमार दामोदर यांना ११ हजार रुपयांची आर्थिक मदत

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा –

समता सैनिक दलाचे सैनिक प्रीतम दामोदर (रा. सुजातपूर) यांना १९ मार्च रोजी आर्थिक मदत देण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे बुलढाणा (उत्तर) जिल्हाध्यक्ष एस. एस. वले यांच्या हस्ते रोख ११ हजार रुपयांची मदत दिली गेली.

प्रीतम दामोदर मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांना आर्थिक मदत देण्याचे आव्हान करण्यात आले होते. मदत समर्पित करताना एस. एस. वले यांनी प्रीतम दामोदर आणि त्यांच्या कुटुंबाला आश्वासन दिले की, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष (संस्कार) के. के. शेगोकार, जिल्हा संघटक एम. ओ. सरकटे, खामगाव शहराध्यक्ष दादाराव हेलोडे, तसेच तेजराव वानखडे, जी. यू. गवई, धरमपाल ससाने, गजानन हिवराळे, गणेश मोरे इत्यादी उपस्थित होते.

यापूर्वी भारतीय बौद्ध महासभा तालुका खामगाव शाखेचे अध्यक्ष विनेश इंगळे आणि तालुका सरचिटणीस विशाल हिवराळे यांनी रोख १५ हजार रुपयांची मदत केली होती.

0 9 4 5 8 2
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *