रायपूरचा पाणी प्रश्न सुटवण्यासाठी पळसखेड धरणाजवळील विहिरीची पाहणी

KHOZ MASTER
1 Min Read

सैलानी

रायपूर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पळसखेड धरणाजवळील विहिरीची तहसीलदार कुमरे व जलसंधारणाचे मनिष गवळी यांनी पाहणी केली. ही पाहणी शिवसेना नेते संदीप गायकवाड यांच्या मागणीवरून गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पळसखेड येथील गजानन चिंचोले यांच्या विहिरीवरून अनेक वर्षांपासून पाण्याची सुविधा सुरु होती, परंतु रायपूर ग्रामपंचायतीकडून मोबदला थकल्यामुळे आणि वाढीव मोबदला मागवण्यात आल्यामुळे काही महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद झाला होता. परिणामी, गावकऱ्यांना दोन-दोन महिने पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. याबाबत गावकऱ्यांनी आंदोलने आणि मोर्चाही काढले आहेत.

पाहणीदरम्यान, तहसीलदार कुमरे यांनी विहिर मालकांशी चर्चा करून तात्पुरता तोडगा काढला आणि रायपूर गावासाठी पाणी पुरवठा सुरु केला. मात्र गावात दररोज पाणी मिळेल अशी हमी अजून नाही. गावात नवीन पाण्याची टाकी असूनही फिल्टर प्लांट सुरु नाही, त्यामुळे ही समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी प्रशासनाने शिवसेना नेते संदीप गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रयत्न सुरु केले आहेत.

या पाहणीसोहळ्यात ग्रामसेवक इंगळे, बालाप्रसाद जैस्वाल, पळसखेड मा. सरपंच रमेश गवते, अनुप अहीर, नीलेश राजपूत, शमीम सौदागर, पंढरी भोसले, मो. सज्जाद मो. हकीम, पवन बांडे, दिपक म्हस्के, सदानंद पाटील, ज्ञानदेव सोनुने, आशीफ सौदागर, ईल्यास, बाळू बिडवे, अमोल वानखेडे, अनिल गावडे, आशिष पाटोळे, राजू सुरोशे, पवन बांडे यांसह शेकडो गावकरी उपस्थित होते.

0 9 4 5 8 2
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *