काठोडा येथून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता; अंढेरा पोलिसांत मिसिंग दाखल

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली –
चिखली तालुक्यातील काठोडा येथील २१ वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. निकिता माधव गिरी असे या तरुणीचे नाव असून ती १७ मार्च २०२६ रोजी दुपारपासून बेपत्ता आहे.

काठोडा येथील रहिवासी संदीप माधव गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ मार्च रोजी दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास निकिता घरी एकटीच होती. यावेळी तिने शेजारी राहणाऱ्या ज्योती हिवरकर यांना “मी माझ्या गावातील मैत्रिणीकडे जात आहे” असे सांगितले आणि घराबाहेर पडली. मात्र रात्र उलटूनही ती घरी परतली नाही.

कुटुंबीयांनी नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी करून तसेच परिसरात शोध घेतला, मात्र तिचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

निकिता माधव गिरी हिची उंची सुमारे ५ फूट २ इंच असून रंग गोरा, केस काळे आणि बांधा सडपातळ आहे. बेपत्ता होताना तिच्या अंगात काळ्या रंगाचा टॉप व लेगीज तसेच पायात भुरकट रंगाची सँडल होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी मिसिंगची नोंद केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार भरत जगन्नाथ पोफळे करीत आहेत

0 9 4 3 8 6
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *