मलकापूर शिवारातील पिकांचे पंचनामे रखडले

KHOZ MASTER
2 Min Read

अवकाळी पावसानंतरही प्रशासन सुस्त; तातडीने मदतीची मागणी

Malkapur

तालुक्यातील शेतशिवारात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना प्रशासनाची यंत्रणा मात्र अद्याप सुस्त असल्याचा आरोप Swabhimani Shetkari Sanghatana चे जिल्हाध्यक्ष Nilesh Narkhede यांनी केला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही पंचनामे आणि मदत प्रक्रियेला अजूनही गती मिळालेली नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष Nilesh Narkhede यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.

शेतात सर्वत्र मका पिके आडवी पडलेली, कणसे जमिनीत रुतलेली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हतबलता स्पष्ट दिसत होती. कापणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यावेळी बोलताना Nilesh Narkhede यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका करत, “अवकाळी संकटानंतर तात्काळ पंचनामे होणे अपेक्षित असताना अधिकारी घटनास्थळी फिरकलेही नाहीत. शेतकरी अडचणीत असताना शासनाची यंत्रणा कागदोपत्रीच का?” असा सवाल उपस्थित केला.

शेतशिवारातील बहुतांश शेतकऱ्यांनी मका व ज्वारी पिकांवर मोठा खर्च केला असून बियाणे, खते, औषधे व मजुरीसाठी घेतलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. उभे पीक आडवे पडल्याने उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“कालपर्यंत सोन्यासारखे उभे असलेले पीक आज मातीला मिळाले. आम्ही कर्ज काढून शेती केली, पण निसर्गाने सर्व काही हिरावून घेतले. अधिकारी अजून आलेले नाहीत, पंचनामा झालेला नाही. आम्हाला फक्त आश्वासन नको, तर तातडीने मदत हवी,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

0 9 4 5 7 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *