Sindkhed Raja –
तालुक्यातील Devkhed येथील रेती घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार लपवण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून Khadakpurna River नदीपात्रात पाणी सोडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवखेड येथील रेती घाटामध्ये जेसीबी, पोकलेनसह इतर यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करण्यात आले. शासनाने निश्चित केलेल्या जागा व खोलीच्या मर्यादा मोडून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केल्याचा आरोप असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे.
या प्रकाराची माहिती बाहेर येऊ नये म्हणून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी एकत्र येत Khadakpurna River नदीपात्रात पाणी सोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, Sindkhed Raja तहसील कार्यालयाकडे अवैध रेती उपशाबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी मार्च महिन्यात नदीपात्रात पाणी सोडण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. एकीकडे प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले जात असताना दुसरीकडे यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.
चौकशी करून कारवाईची मागणी
नदीकाठच्या नागरिकांकडून दरवर्षी मार्च महिन्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होत असली तरी सध्याचा परिसर हिरवागार असताना देखील पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अवैध रेती उपसा लपवण्यासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Users Today : 4