आज दसरा व धम्मचक्र प्रवर्तन कविता

Khozmaster
1 Min Read

सण साजरा ..

 

नव्यायुगात साजरा

नवरूपातला दसरा

पुरोगामी विचाराला

सण ना भला दुसरा

 

छान सुयोग्य मुहूर्त

रे वैरभावना विसरा

आलिंगन दे दुजाला

बाहु उस्फुर्त पसरा

 

भेद भाव सिमोलंघन

जातीपाती न आसरा

क्षितिजापार पहायचे

मित्रत्व मार्ग अनुसरा

 

आनंद सोने लुटायचे

प्रत्येक व्हावा हसरा

स्नेह संमेलन घडावे

शक्ती प्रदर्शन विसरा

 

नियम कायदे पालन

हातात हवा कासरा

रे गोंगाटहुल्लडबाजी

काबुत महोत्सव बरा

 

पर्यावरण सांभाळावे

उन्माद नको माजरा

नुकतेचं सरले निर्बंध

सावरून जपावे जरा

 

– हेमंत मुसरीफ पुणे

 ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *