आमचा होतो उत्सव
पोलीस घाली गस्त
आम्ही नाचू उन्मादे
अन् ते काळजीग्रस्त
सोहळे होती साजरे
बंधने सारी मदमस्त
सुरक्षीत राहते रयत
असा चोख बंदोबस्त
सौजन्याने वागा जरा
पोलीसांवरती भिस्त
आम्ही मात्र मन मुक्त
नकोशी वाटते शिस्त
वर्दीअसावी संयमीत
नियमां मध्ये बंदिस्त
बंधने आम्हां नावडे
समारंभ जमवा मस्त
बदनाम करे वर्दीला
आमचे मलीन हस्त
भल्या अशा नेत्यांचा
आम्हांवर वरद हस्त
सतर्क हवे हवालदार
झोपी आमच्या सुस्त
जाणा उपकार कधी
जयावर ठेवी भिस्त
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 15