विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप : ग्रामीण शिक्षणाला चालना

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा –
Sindkhed Raja येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात *२५ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण* करण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी भेडसावणाऱ्या अडचणी दूर होणार असून *शिक्षणात सातत्य आणि उपस्थिती वाढण्यास मदत होणार आहे*, असे मान्यवरांनी सांगितले. या सायकल वाटपामुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमामुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढला असून, उपक्रमाच्या यशामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. भागोजीराव तायडे, सचिव श्री. त्र्यंबकराव ठाकरे, उपाध्यक्ष श्री. सतीश तायडे व संचालक श्री. अतिश तायडे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. रामप्रसाद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी पर्यवेक्षक पि. यू. मस्के व सध्याचे पर्यवेक्षक श्री. मित्तल मेहेत्रे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

विद्यार्थिनींना माजी वर्गशिक्षक पठाण सर व गीते सर यांचे मार्गदर्शन लाभले असून, सध्याचे वर्गशिक्षक श्री. ए. एम. तायडे यांनी दिलेली प्रेरणादायी साथही महत्त्वाची ठरली.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून, या सायकल वाटपामुळे *ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.*

0 9 6 5 3 8
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *