अमरावतीत वर्षभरात पाण्यात बुडून २१ जणांचा मृत्यू; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

KHOZ MASTER
2 Min Read

अमरावती –

जिल्ह्यात नदी, तलाव, कालवे आणि खदानींमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२५ ते १० मे २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये तब्बल २१ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बहुतांश घटना नदीकाठ, तलाव, खोल पाणीसाठे आणि असुरक्षित पर्यटनस्थळांवर घडल्या असून प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, वरुड तालुक्यातील सेकदरी तलाव, दर्यापूर येथील पूर्णा नदी, नांदगाव पेठ परिसरातील वाळकी डॅम, मोर्शीतील माळू नदी, मंगरूळ दस्तगीर येथील कोलाड नाला, पेढी नदी, धारणीतील घाडगा नदी, तिवसा तालुक्यातील विरगव्हाण शेततळे, खंडू नदी, बेंबळा नदी, चंद्रभागा नदी, अडगाव खदान तलाव, सिंभोरा नदी पात्र, आनंदवाडी कॅनल आणि छत्री तलाव येथे बुडून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, १० मे रोजी घातखेडा येथील तलावात घडलेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या बहुतांश ठिकाणी सुरक्षा जाळी, बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा आपत्कालीन बचाव यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात नदी व तलाव परिसरात नागरिकांची गर्दी वाढत असल्याने दुर्घटनांचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर शोध पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करते. अनेकांचे प्राण वाचविण्यातही पथकाला यश आले आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शोध पथक सज्ज करण्यात आले असून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, धोकादायक जलसाठ्यांच्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

0 9 7 1 3 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *