नाशिक महापालिकेत इंटर्नशिप व फेलोशिप कार्यक्रमाचा प्रस्ताव; शहर विकासात तरुणांचा सहभाग वाढणार

KHOZ MASTER
1 Min Read

नाशिक :

नाशिक शहराचा विकास अधिक वेगवान, आधुनिक आणि कल्पक पद्धतीने व्हावा यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत नाशिक महानगरपालिकेत ‘इंटर्नशिप व फेलोशिप कार्यक्रम’ सुरू करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

शहरातील वाढते शहरीकरण, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि नियोजनात्मक मदतीची गरज भासत आहे. या गरजेला पूरक ठरावा म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रस्तावित कार्यक्रमांतर्गत अभियांत्रिकी, एमबीए, विधी, आर्किटेक्चर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थेट प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होईल, तर दुसरीकडे शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना नवे दृष्टिकोन आणि नवकल्पना मिळतील.

या उपक्रमामुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक गतिशीलता येऊन निर्णय प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान आणि तरुणाईचा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तरुणांच्या ऊर्जेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा प्रस्ताव पुढे नेण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0 9 7 2 8 3
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *