औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद, येथील कांत़ी चौक पोलीस स्टेशनची सर्वात मोठी कारवाई दिनांक ५/१०/२०२२ रोजी रात्री ०२.०० ते ०३.०० वाजेच्या दरम्यान मोढा भागातील बालाजी इंटरप्रायजेश दुकाणाचे शटर फोडुन कोंबडा विडीचे १४ कार्टुन बॉक्स चोरी झाले होते. सदर गुन्ह्यांत आरोपींनी तोंडाला रुमाल बांधुन सर्व सिसीटिव्ही बंद करून शटर फोडुन चोरी केली होती.सदर चोरी मध्ये कोणतेही सिसीटिव्ही फुटेज नसतांना, कोणतेही महत्वपूर्व सुगावे नसतांना क्रांतीचौक पोलीसांनी कौशल्याने गोपणीय बातमीदार यांची माहीती व तपास कौशल्य पणास लावुन, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री जी. एच. दराडे यांच्या मार्गदर्शना खाली सदर गुन्ह्यांतील आरोपी नामे १) सोमनाथ रमेश उने वय १९ वर्ष, धंदा ड्रायव्हर रा.जुना मोढा रोहीदासपुरा औरंगाबाद याची माहीती मिळवीली व सदर आरोपी हा सर्पमित्र असल्याने त्याचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्यास आमचे घरात साप निघल्याचे कारण सांगुन दिवाण देवडी येथे बोलावुन घेवुन त्यास ताब्यात घेतले व आरोपीस पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून सदर गुन्ह्यांबाबत विचारपुस केली असता त्यांने सदर गुन्ह्यांची कबुली देवुन त्याचे इतर साथीदारांची नावे सांगीतली त्याचे आरोपी साथीदार नाम २) अविनाश बाबुराव जगताप वय २२ वर्ष रा. जुना मोढा रोहीदासपुरा औरंगाबाद ३) फारुख शहा चांद शहा वय २२ वर्ष रा. हरीराम नगर बीडबाय रोड औरंगाबाद ४) अन्वर रशीद पाटण वय ३२ वर्ष रा. कटकट गेट औरंगाबाद ५) सुयोग उर्फ सोनु संतोष जाधव वय २२ वर्ष रा. रमानगर, ग.नं.३, उस्मानपुरा औरंगाबाद यांना सापळा रचुन अटक केली. तसेच आरोपीचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल कोंबडा बिडीचे १४ कार्टुन बॉक्स, संगणक सिपीयु, असा १,४०,०००/- रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यांत वापरण्यात आलेला छोटा हत्ती व एक बजाज पलसर मोटार सायकल असे एकुण किंमत अंदाजे ४,०२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद कारवाई मा. पोलीस आयुक्त, निखील गुप्ता सो, पोलीस उप आयुक्त परि-१, श्रीमती उज्ज्वला बनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अशोक थोरात सो. शहर विभाग, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. गणपत दराडे, पो.उप.नि. श्री. विकास खटके,संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर,मंगेश पवार,इरफान खान, संतोष सूर्यवंशी,भावलाल चव्हाण,हनुमंत चाळणेवाड, कृष्णा चौधरी यांनी केली आहे.