देवेंद्र सिरसाट नागपूर. मागील 17वर्षांपासून शिक्षक जुनी पेन्शन साठी विविध संघटनांवर विश्वास दाखवून विश्वासाने त्यांच्या पाठीशी उभे होते. पण जुनी पेन्शनची मागणी अद्यापही कोणत्याही शिक्षक संघटनाकडून सोडवल्या गेली नाही. आघाडी आणि युती सरकारच्या काळात राजकारण्यांकडून निव्वळ पोकळ आश्वासनांचे गाजर देण्यात आल्याने पेन्शन शिलेदारामध्ये नाराजीचे सूर ऐकायला मिळत आहे. म्हणून आता एनपीएस/डीसीपीएस धारकांचा कोणत्याही संघटनेवर विश्वास राहिला नसल्याने आता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शिक्षक मतदार निवडणुकीमध्ये उतरणार आहे. नागपूर विभागामध्ये एनपीएस/डीसीपीएस धारक शिक्षक जवळपास 15 हजारांच्या वर आहेत. त्यामुळे एक गठ्ठा मतदान हा एनपीएस/डीसीपीएस धारकांचा असून सुद्धा अजूनपर्यंत यांना शिक्षक आमदार जुनी पेन्शन योजना लागू करवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आपल्या हक्काचा एनपीएस/डीसीपीएस धारक उमेदवार देण्याचे ठरविण्यात आले आणि त्यासाठी उमेदवारांची चाचपणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन समर्थित पेन्शन बचाव कृती समितीचे नागपूर जिल्हाध्यक्ष नरेंद्र पिपरे यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे. 2014 पासून नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन डी. सी. पी. एस व एन.पी.एस योजना कशी फसवी आहे व जुनी पेन्शन योजना किती फायदेशीर आहे. याबाबत शिक्षकांमध्ये जनजागृती करून नागपूर विभागातील पीडित शिक्षकांना संघटीत करण्याचे काम राज्याध्यक्ष शिवराम घोती व संघटनेच्या पदाधिकारी यांनी केलेले आहे. तसेच नरेंद्र पिपरे यांनी पेन्शनसाठी धरणे आंदोलन, साखळी उपोषण, मुंडन आंदोलन यासारखी आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे संघटनेचे सर्व पेन्शन शिलेदार व पदाधिकारी नरेंद्र पिपरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे उमेदवार हे दमदार असल्याने बाकीच्या संघटनांना मात्र नक्कीच घाम फोडतील.यात तिळमात्र शंका नसल्याचा विश्वास उपस्थितांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. 1)
राज्यांमध्ये तिनं शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच शिक्षक संघटनांनी चांगलीच कंबर कसलेली दिसत आहेत. राज्यात विधानपरिषद निवडणुकाचे बिगुल वाजल्यानंतर 1ऑक्टोबर पासून नाव नोंदणी करण्यासाटी सुरुवात झालेली असल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक जन सज्ज झाले आहेत. एक ऑक्टोबर ते सात नोवेंबर पर्यंत होणाऱ्या या नोंदणी अभियानात सर्व शिक्षकांची नोंदणी करून घेण्यासाठी सर्वच संघटना सरसावल्या आहेत. २)
नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क शिक्षक संघटनेची संपर्क यंत्रणा प्रभावी पध्दतीने राबवुन शिक्षकांचे मजबूत संघटन करण्यामध्ये शिवराम घोती व नरेंद्र पिपरे यांचा सिंहाचा वाटा आहे. नागपूर विभागामधे आतापर्यंत ज्या संघटनेचे आमदार असले तरी या खेपेला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना पूर्ण ताकतीनीशी या निवडणुकीमधे उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राज्याध्यक्ष शिवराम घोती आणि नरेंद्र पिपरे यांनी दिली. सदर पत्रकार परिषदेला राज्य पदाधिकारी गजानन टांगले, तेजराम बांगडकर, नदीम खान, यशवंत कातरे, प्रवीण भोगे, विशाल बमनोटे, कोहिनूर वाघमारे जिल्हाध्यक्ष, विशाल बोरकर शहराध्यक्ष, रामकृष्ण ठाकरे, जगदीश लडके, स्वप्नील गवळी, देविदास येलूरे,जिल्हाउपाध्यक्ष, महीला आघाडी प्रमुख अंजुषा बोधनकर, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गलांडे, नरेंद्र फाले, सुनिल कोल्हे,रविंद्र हिवरकर, देवेंद्र खराटे,रविंद्र वाथ, विश्वास बोरकर, विनोद लच्छोरे, राजेश गजभिये, अनिल बरांगे, चंद्रशेखर रेवतकर बहुसंख्य पेन्शन ग्रस्त शिक्षक बधू ,भगिनी उपस्थित होते.