पानस येथील अठरा वषीँय तरुणी बेपत्ता

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड तालुक्यातील पानस येथील एक अठरा वर्षीय तरुणी शुक्रवारी (ता. एक) रात्री राहत्या घरातून बेपत्ता झाली. मुलीचे वडील उत्तम सखराम वराडे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अजिंठा पोलीसांनी हरविल्याची नोंद केली आहे. दुर्गा उत्तम वराडे (वय १८)असे या तरुणीचे नाव असून, तिचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. सडपातळ बांधा, हिंदी व मराठी भाषा बोलता येतात. पांढऱ्या रंगाचा टॉप व भुरक्या रंगाची पंजाबी ड्रेसची पॅन्ट परिधान केलेली आहे. अशा वर्णाची तरुणी आढळून आल्यास अजिंठा पोलीस ठाण्याचा संपर्क साधावा दुरध्वनी क्रमांक (०२४३९२८८३३३) किंवा बीट जमादार अरुण गाडेकर यांच्या (भ्रमणध्वनी क्र: ९८५०२६१३८९) वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *