चंद्र असे दुर जरी
प्रकाश साठे अंतरी
चंद्र अन् माणसाचे
नाते गाजे दिगंतरी
चंद्रा तुझे खरे रुप
कळले ते आताजरी
कवि कल्पनेतला तू
कोरलेला मना वरी
तुज वाचूनि साजरी
होईल न कोजागिरी
जमलेतं मित्र सगळे
उत्साहाने गच्चीवरी
टिपुर चांदणी सडा
मोहक भासे भरजरी
मधाळ ही गार हवा
अंगा मधुर शिरशिरी
दुग्धपान ते करताना
जरुर वाटावे शेजारी
घासातला घास देता
चव तया असे न्यारी
मन शुद्ध स्वच्छ राहो
डाग कठला ना ऊरी
परके ही मित्र व्हावे
राहू नये कुणीचं वैरी
आधुनिक असे जरी
चंद्रावरी पोचलो तरी
चंद्र भावे भावनेतला
रूपडे ठसे मनावरी
-हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 15