देवेंद्र सिरसाट.नागपूर .शासनाच्या ‘आधार कार्ड ॲट बर्थ’ सेवेअंतर्गत बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील पहिली कार्यवाही!!शासनानेही ‘आधार कार्ड ॲट बर्थ’ (जन्मत: आधार) अशी सेवा सुरू केली असून, याअंतर्गत जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात बालिकेची आधार नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील जन्मत: आधार नोंदणी झाल्याचे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे.यूआयडीएआयने बालकाचा जन्मल्याबरोबरच आधार कार्ड बनवू शकण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, यूआयडीएआयने तशी परवानगी दिली आहे. एक दिवसाच्या बालकाचेही आता आधार नोंदणी होवू शकते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता प्रसूती झालेल्या मातेला रुग्णालयातूनच ही सुविधाही उपलब्ध होणार आहे. उमरेड तालुक्यातील बेला पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास ढोक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ६ ऑक्टोबर रोजी बेला पीएचसीअंतर्गत येणाऱ्या सालई राणी गावातील वैशाली नरेश वाघाडे या महिलेची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिचे पालकांनी नावही ठेवले. यानंतर डॉ. विकास ढोक यांनी सर्वप्रथम मुलीचे जन्म प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी समन्वय साधून आधार नोंदणीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क केला. तेथील अधिकारी भोगे यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी पोस्ट कार्यालयातील पथक पीएचसीमध्ये पाठविले. त्या पथकाने मुलीचे जन्मप्रमाणपत्र, आई-वडिलांचे आधार क्रमांक हे आधार नोंदणी ॲपमध्ये ‘फिड’ केले. मुलीच्या आईच्या हाताचा ‘थम’ घेऊन बाळाचा फोटो घेऊन प्रमाणिकरण करून आधार नोंदणी पूर्ण करण्यात आली. ही नोंदणी पूर्ण होताच त्यासंदर्भातील संदेश (एसएमएस) त्या पालकांच्या आधार संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त झाला. सोबतच नोंदणी यशस्वी झाल्याची स्लीपही मुलीच्या आईला सुपुर्द करण्यात आली. शासकीय नियमानुसार लवकरच त्या चिमुकलीचे आधार कार्डही तिला पोस्टाद्वारेच घरपोच पोहोचते होणार असल्याचे सांगण्यात येते.- आरोग्य विभागाच्या सूचना‘आधार कार्ड ॲट बर्थ’ संदर्भात जिल्हा आरोग्य विभागानेही सर्व पीएचसींना सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रसूतीनंतर गर्भवती मातेच्या बालकाला आधार कार्ड द्यावयाचे आहे. त्यासाठी मातेला डिस्चार्ज देण्यापूर्वी बाळाचे जन्मदाखला काढून नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधून आधार नोंदणी करायची आहे.
Users Today : 22