औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत फीडर पिलरमधून तांब्याच्या पट्ट्या लांबवण्याच्या प्रयत्न फसला चिखलठाणा येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले फीडर पिलरमधून तांब्याच्या पट्ट्या लांबवण्याच्या प्रयत्न फसला चिकलठाणा एमआयडीसीत असलेल्या महावितरणच्या ग्रामीण मंडल कार्यालयासमोरील लहुजी चौकात फिडर पिलरमध्ये वीजपुरवठ्याशी निगडित असलेल्या कॉपर पट्ट्या काढताना दोन चोरट्यांना महावितरणच्या दक्ष कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ नागराज खिल्लारे
यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, शनिवारी दि.८/१०/२२ रोजी दुपारी दीड ते पावणेदोन वाजेदरम्यान आमच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखा कार्यालयात दैनंदिन कामाबाबतची आढावा बैठक सुरू होती. त्यादरम्यान मला आमचे सहायक अभियंता श्याम मोरे यांनी सांगितले की, ग्रामीण मंडल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही लोक जमा झाले आहेत. त्यावेळी मी व मोरे साहेब गेलो तेव्हा त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम फिडर पिलरमध्ये वीजप्रवाहाशी संबंधित असलेले कॉपर पट्ट्या काढताना दिसले. त्यावेळी आम्ही त्यांना कॉपर पट्ट्या का काढता, अशी विचारणा केली त्यावेळी सदर दोन्ही इसम घाबरलेले दिसले. त्यावरुन आम्ही दोन्ही इसमांना पकडून त्यांचे नाव व पत्ता विचारले असता शेख रफिक शेख युसुफ (46 वर्षे रा. मिसरवाडी, नारेगाव व किशोर अशोक सोळंके (३० वर्षे रा. शिवाजी नगर, नवीन पाण्याच्या टाकीजवळ) अशी नावे त्यांनी सांगितली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.