औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत शिवतीर्थ जळकी बाजार येथे एक्कावन जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची केली महाआरती सिल्लोड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये दिनांक 9 ऑक्टोंबर रविवार सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांच्या 387 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. व तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 9 ऑक्टोंबर 1635 मध्ये सातारी मातीतले वीर प्रतापगडावरील रणसंग्रामातील छत्रपती शिवरायांचे प्रमुख अंगरक्षक शिलेदार जिवाजी महाले यांची आज जयंती. अफजलखानाने जेव्हा राजांना भेटीला बोलावले तेव्हा त्यांच्या सोबत जे दोन अंगरक्षक होते त्यापैकी एक होते ” जिवाजी महाले ” आणि दुसरे होते संभाजी कावजी. जेव्हा अफजलखानचा कोथला शिवरायांनी बाहेर काढला तेव्हा खानाचा चा अंगरक्षक सय्यद बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध असतांना धावून आला तेव्हा त्या सय्यद बंडाला धरतीवर कायमचा झोपविणारा वीर म्हणजे जिवाजी महाले. म्हणून म्हणतात ना की “” जिवाजी होते म्हणून वाचले होते छत्रपती शिवाजी महाराज “” अशा नरवीर जिवाजी महाले यांना 387 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. यावेळी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष पंडितराव दांडगे, उपाध्यक्ष प्रमोद दांडगे, मंदिर समितीचे प्रसिद्धीप्रमुख तथा आदर्श गावकरीचे पत्रकार विनोद दांडगे, मंदिर समितीचे सदस्य युवराज पाटील दांडगे, अंबादास वर्पे, गोपाल सुराशे, अमोल वरपे, अंबादास दांडगे, किरण जाधव, जगताप, भगवान वर्पे, सुनील वर्पे, मनोहर दांडगे, रवी जाधव, गजानन दांडगे, सुभाष वर्पे, मंगलाबाई वर्पे, छायाबाई वर्पे, मंदिर समितीचे सर्व सदस्य यांच्या सह गावातील महिलांची, व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.