औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद इंद-ए मिलादुन्नबी निमित्त शहरात जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात, नाते रसूलच्या स्वराने जुलूस-ए मोहम्मदीला सुरुवात झाली. या जुलूसचे विविध चौकात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. या जुलूसमध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.शाहगंज येथील निशामोद्येन दर्गाह चौकापासून रविवारी (दि.९) सकाळी ९ वाजेच्या सुमारास जुलूस-ए मोहंमदीची सुरुवात करण्यात आली जुलूसचे उद्घाटन शहर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. पाळी संयोजक डॉ. शेख मुर्तुझा, माजी महापौर रसीद माम डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा संदेश समाजातील प्रत्येकाने आत्मसात करावा, असे पोलीस आयुक्त गुप्ता यावेळी म्हणाले, कुराण शरीपच्या पठणाने शाहगंजच्या हजरत निनामोद्दीन चौकातून या जुलूसला सुरुवात झाली, ढोल-ताशांच्या गजरात जुलूस जिन्सी,चंपा चौक,शहाबाजार,चेलीपुरा,मंजुरपुरा,लोटाकांरजा,बुढ्ढीलाईन,सिटीचौक,गांधी पुतळा मार्गाने शाहगंज येथील हजरत निजामोद्दीन चौकात आला. या जुलूसमधील सहभागी नागरिकांसाठी ठिकठिकाणी पाणी, सरबत आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती मो.आरिफ मो.लुखमान उपसरपंच सावळदबारा यांनी सांगितले.जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने रक्तदान शिबिर ईद-ए-मिलादुन्नवीनिमित जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने शहरातील सहा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने युनूस कॉलनी येथील मर्कज इस्लामी कार्यालय, टाऊन हॉल येथील लाल मशिद आणि पैठण गेट येथील शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.