सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राजकुंवर महाविद्यालय धनवट फर्दापूर येथे स्पर्धा परीक्षा संबंधी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रभादेवी मुंबई, ईश्वर चिंतामण गोयर यांनी स्पर्धा परीक्षे मध्ये येणाऱ्या समस्या व त्यावरील निवारण यासंबंधी मार्गदर्शन केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ए.जे बेडवाल, प्राध्यापिका टोके मॅडम, यांनी ही स्पर्धा परीक्षे संबंधी मार्गदर्शन केले . सदर मार्गदर्शन शिबिरा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ए. जे बेडवाल यांनी
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर स्पर्धा परीक्षेस येनाऱ्या समस्यांवर निवारण कस करता येईल यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मारगदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलेश बावस्कर यांनी केले तर याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. फिरोज तडवी सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. या प्रसंगा वेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक
वाय.आर. पाटील सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळेस प्राध्यापक सुनील बिराडे, प्राध्यापक गजानन पाटील, प्राध्यापक नरेश शेळके, प्राध्यापक अक्षय पवार, प्राध्यापक कृष्णा शिरसाट, प्राध्यापिका मनीषा शिंदे, माधुरी सपकाळे, ज्योती मंगरूळे, पूजा गावंडे, पूजा गव्हाणे, व लोखंडे, सुगरा तडवी या उपस्थित होत्या.