औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद येथे तरुणीच्या मोबाईलमधील इन्स्टाग्राम, व्हाटसअॅपवर अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारला. त्यावर तरुणाच्या पित्याने आपल्या मुलाला त्रास दिला तर तुम्हाला पाहून घेईल, असे धमकावले. त्यावरून पिता-पुत्राविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद,छावणी परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या इन्स्टाग्राम, व्हाटसअॅपवर जॉय सचिनराज निर्मळ हा मेसेज व अश्लील व्हिडीओ पाठवत होता. त्यावरून तरुणीच्या थोरल्या बहिणीने जाब विचारला. त्यावर सचिनराज निर्मळ याने आपल्या मुलाला त्रास दिला तर तुम्हाला पाहून घेईल, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही, असे धमकावले. त्यावरून तरुणीच्या पित्याने छावणी पोलिस ठाणे गाठत निर्मळ पिता-पुत्राविरुध्द तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे करत आहेत.