औरंगाबाद घरफोड्यांकडून दागिन्यांसह साहित्य हस्तगत

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद अट्टल घरफोड्यासह त्याच्या तीन साथीदारांना मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सोन्याचे झुंबर, गॅस सिलेंडर व शेगडी, असा ऐवज जप्त करण्यात आला. भारत ऊर्फ जॉन शंकर तीर्थे २९, रा. गल्ली क्र. १५, जयभवानीनगर, मुकुंदवाडी,असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. मुकुंदवाडी परिसरातील गौतम दयाराम औचरमल (वय ६०, रा. एशियाड कॉलनी) याचे २ ऑक्टोबर रोजी घर फोडून चोरांनी सोन्याचे झंबर, गॅस सिलेंडर व शेगडी लांबवली होती. त्यावरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा छडा लावत ८/१०/२२ शनिवार रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गिते, अनिल थोरे, संतोष भानुसे आणि गणेश वाघ यांनी भारत तीर्थे, प्रकाश ऊर्फ बंटी शाळीकराम शिंगाडे (२५, रा. गल्ली क्र. २, जयभवानीनगर, मुकुंदवाडी), अनिल ऊर्फ पिलेवान दादाराव आव्हाड (३५, रा. भारतनगर) आणि अभिषेक विष्णू शिंदे (२२. रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) यांना पकडले. त्यांच्याकडून दहा ग्रॅमचे झुंबर, गॅस सिलेंडर आणि शेगडी जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत करत आहेत.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *